शिक्षिकेचा नादच खुळा! “अशी मी मदन मंजिरी..” गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन December 27, 2024 by Abhi school teacher dance सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षिकांचा आहे. या शिक्षिकांनी एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by Sapana Rathod (@sapana0014) शाळा म्हटलं की अभ्यास, परीक्षा, शिक्षा करणारे किंवा ओरडणारे शिक्षक अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. शिस्तीत वागण्याचे ठिकाण अशी शाळेची ओळख असली तरी आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ आपण या शाळेत एन्जॉय करत असतो. एकदा हे दिवस गेले की पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळे शाळेतील प्रत्येक क्षण फक्त अनुभवायचा असतो. आपला सर्वांगाने विकास होण्यात शाळेची खूप महत्त्वाची भूमिका असते. अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकत आपण शाळेतून बाहेर पडतो आणि खऱ्या जगाला सामोरे जातो. शाळेतले शिक्षक हे अनेकदा कडक असतात, पण काही शिक्षक आपल्या वयाचे होऊन आपल्यासोबत मज्जा करणारेही असतात,असे शिक्षक आपल्या कायम लक्षात राहतात. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा शिक्षक नेहमी विद्यार्थयांवर रागावलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते. पण ते देखील एक माणूस आहेत, त्याला नाचायला, गाणे आणि जीवनाचा आनंद घेणे देखील आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही शकता, शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या “अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी” या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत.